ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने सभा व सत्कार समारंभ संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन व निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या वतीने संघटनेचे पदाधिकारी,विभाग समन्वयक यांची सभा व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. नंदकिशोर खत्री, यंग टीचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, संघटनेचे मार्गदर्शक व कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप घोरपडे, भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सिनेट सदस्य डॉ. विवेक शिंदे, संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, संदीपभाऊ गड्डमवार, नंदू भाऊ खनके,डॉ.कार्तिक शिंदे, प्राचार्य राजेश इंगोले, प्राचार्य लेमदास लडके, गोंडवाना यंग टीचर चे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, संघटनेचे सचिव डॉ. विवेक गोरलावार इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते

      यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. बबनराव तायडे यांनी यंग टीचर्स संघटनेचा इतिहास सांगून शिक्षकांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्याकरिता संघर्ष करून कार्य करणारी संघटना असल्याचे सांगून ही संघटना गोंडवाना विद्यापीठातील सर्व शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन डॉ. तायवाडे यांनी यावेळी केले.यावेळी सभेचे मार्गदर्शक व संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप घोरपडे यांनी विद्यापरिषद ,सिनेट, आणि व्यवस्थापन परिषदेमध्ये कार्यरत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करावे व संघटनेची विकासात्मक भूमिका विशद करावी असे प्रतिपादन केले.

     यावेळी सभेचे आयोजक व भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सिनेट सदस्य डॉ.विवेक शिंदे यांनी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे कार्य प्रगतीशील असल्याचे सांगून संस्था, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करू असे प्रतिपादन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याचा आढावा विशद केला .सभा व सत्कार समारंभाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर खत्री यांनी संघटनेने अविरत शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करावे आम्ही आपल्या सदैव पाठीशी आहोत असे अभिवचन दिले.

  यावेळी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन मधील पदाधिकारी असलेले आणि गोंडवाना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त करणारे डॉ.विवेक शिंदे( सीनेट),डॉ. सतीश कन्नाके( एनसीसी), डॉ.संजय साबळे (ग्रंथालय), डॉ.शरद बिलोरकर( राष्ट्रीय सेवा योजना)यांचा संघटनेच्या वतीने शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त डॉ. खत्री महाविद्यालय चंद्रपूर व निळकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती या दोन महाविद्यालयाचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य पदी विराजमान झाल्याबद्दल डॉ. जनार्दन काकडे,डॉ.रवींद्रनाथ केवट यांचा संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

   यावेळी संघटनेच्या वतीने डॉ. विशाल मालेकर,डॉ. संतोष डाखरे डॉ. अनिस खान,डॉ. नितीन कत्रोजवार ,डॉ. संदीप सातव डॉ. बिना मून,डॉ. चेतन वानखेडे या प्राध्यापकांची संघटनेच्या विभागीय समन्वय पदी निवड करण्यात येऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली

सभा व सत्कार समारंभाचे बहारदार संचालन संघटनेचे सचिव डॉ. विवेक गोरलावर यांनी तर आभार प्रदर्शन निळकंठराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लेमराज लडके यांनी केले. स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये