ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मजुराचा मुलगा बनला डॉक्टर : सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बागला वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय डिग्री वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला,बल्लारपूर येथे मजूर म्हणून काम करणाऱ्या असिफ सिद्दीकी नामक कामगाराच्या मुलाने डी एच एम एस डिग्री घेतल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
या समारंभात डॉ. सुचिता वैद्य, डॉ आनंद फुलझेले डॉ अविनाश शर्मा, डॉ.मोनिका पिसे,सर्व डिग्री धारक विद्यार्थी,असिफ सिद्दीकी,नसरीन आसिफ सिद्दीकी, सह अन्य मान्यवर हजर होतो.सर्वांनी तोखीर असिफ सिद्दीकी सह अन्य विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.व समोरील शिक्षणासाठी शुभेच्या दिल्या.