विरंगुळा भवन देऊळगाव राजा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त, विरंगुळा भवन देऊळगाव राजा येथे तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, व जनसेवा सामाजिक संघटना, देऊळगाव राजा यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री जिजेबा मापारी मामा होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री प्रकाश खांडेभराड,अध्यक्ष श्री सहकार महर्षी भास्करराव शिंगणे वाचनालय तसेच जनसेवा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी श्री रमेश नरोडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला जनसेवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री मापारी मामा, उपाध्यक्ष श्री प्रकाश खांडेवाड, पदाधिकारी श्री रमेश नरोडे , सचिव श्री गोविंद भाऊ बोरकर, श्री दिनकर भाऊ जाधव उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री गोविंद भाऊ बोरकर यांनी केले



