समर्थ महाविद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा
महिलांचा सन्मान कृतीतून सिद्ध व्हावा : नंदाताई कायंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, सलग्न समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे आयोजीत जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, होत्या.
तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर पुंड, सुनिता पुंड, डॉ स्नेहल पुंड, संचालिका, शाश्वत हॉस्पिटल जालना, प्रांजल पवार, नायब तहसीलदार सिंदखेड राजा, अश्विनी डोईफोडे, डेप्युटी मॅनेजर, पंजाब नॅशनल बँक, प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे, प्राचार्य डॉ प्रफुल्ल ताठे यांनी दीप प्रज्वलन व स्व. देवानंद कायंदे, राष्ट्रमाता मा जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे यांनी मानवी जीवनामध्ये महिलांचे अनन्यसाधारण महत्त्व व ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो, तेथे सुख, शांती आणि समृद्धी नांदते. म्हणून महिलांचा सन्मान प्रत्येकाने करावा आणि हे आपल्या कृतीतून सिद्ध व्हावे. याबरोबरच महिला
सक्षमीकरणाला गती देण्यासाठी ‘ क्रिया वेगवान करा’ या जागतिक महिला दिनाच्या संकल्पनेनुसार कार्य करण्याचे आवाहन विद्यार्थिनींना केले. नंदकिशोर पुंड यांनी स्त्री ही संपूर्ण वर्तुळ असते तिच्या आत निर्माण, संगोपन व परिवर्तन करण्याची शक्ती असते असे विशद केले. डॉ स्नेहल पुंड यांनी महिलांचे आरोग्य याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
प्रांजल पवार यांनी विद्यार्थिनींना महिला दिनानिमित्त मुलींना स्पर्धा परीक्षेमध्ये असलेल्या उपलब्ध संधी बद्दल माहिती दिली. त्यानंतर अश्विनी डोईफोडे यांनी महिलांचे हक्क, महिलांवर होणारा अत्याचार व शोषण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश टाकला. रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी जाधव यांनी महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांनी महिला शिक्षण समानतेमध्ये जलद प्रगतीचे आव्हान कर्ते शिक्षण, रोजगार व महिलांना प्रगती प्रगतीला चालना देणाऱ्या धोरणाविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ प्रफुल्ल ताठे यांनी महिला समाजाच्या खरा शिल्पकार आहे असे सांगितले. तसेच प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे व नंदकिशोर पुंड यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री सानप तर आभाप्रदर्शन प्रा किरण सानप यांनी केले. या कार्यक्रमास रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा किरण ठाकरे, प्रा नागरे, प्रा सोळंकी, प्रा कवर, प्रा चकदळे, काळुसे, लाड, घुगे, काकड दोन्ही महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.