कर्माची गति न्यारी आहे : मुनी विशेषसागर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भगवान महावीर स्वामींनी त्यांच्या दिव्य उपदेशात म्हटले होते की, व्यक्ती जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान बनतो, केवळ जैन कुटुंबात जन्म घेतल्याने माणूस जैन होत नाही. जो दररोज मंदिरात जातो, जो रात्रि जेवनाचा त्याग करतो,पाणी गाळुन पितो, तोच जैन म्हणण्यास पात्र आहे. उक्त उद्गार परम. पूज्य श्रमण मुनी श्री विशेषसागर जी गुरुदेव यांनी देवलगांवराजा येथील धार्मिक मेळाव्याला संबोधित करताना सांगितले.
पू मुनिश्री पुढे म्हणाले की, चांगल्या भावनांचे परिणाम कधीच वाईट नसतात आणि वाईट भावनांचे परिणाम कधीच चांगले नसतात. एका व्यक्तीमूळे समाज आणि कुटुंबा चे नाव होते आणि एका व्यक्तीमुळे कुटुंब आणि समाजाचे नाव बदनाम होते. एका व्यक्तीमूळे समाजाला धार्मिक अनुष्ठानामध्ये भाग घेण्याची, गुरुंची सेवा करण्याची संधी मिळते आणि एकाच व्यक्तीमुळे हातात असलेली संधीही निघून जाते.
जैन धर्म हा कर्माच्या तत्वांवर आधारित धर्म आहे. या कर्मांनी तीर्थंकरांनाही सोडले नाही. माणूस हसत हसत स्वतःला कर्माशी बांधतो. पण जेव्हा कर्म उदयास येतो तेव्हा रक्ताचे अश्रु वाहतो . कोणाला घाबरा अथवा नको घाबरा मात्र कर्माना नक्की घाबरा, प्रवचन सभे मधे प. पू मुनी विश्वदक्ष सागरजी आणि पूज्य क्षु. विश्वोतीर्ण सागरजी विराजमान होते.