Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

हेल्पिंग हँड्सच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना परिनिर्वाणदिनी अनोखे अभिवादन

"एक वही, एक पेन" या उपक्रमाला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

      शहरामधील स्थानिक ‘हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना बस स्टॉप, भद्रावती येथे “एक वही, एक पेन” हा उपक्रम राबवून दि.०६ डिसेंबर ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांच्या कार्यास आणि स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

           भद्रावती शहरांमधील जनतेनेही या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व बऱ्याच वह्या आणि पेनी दान स्वरूपात स्विकारण्यात आल्या.

जमा झालेले वही आणि पेन गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, गावाखेड्यात, घरोघरात पोहोचवून वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमा मार्फत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक छोटीशी मदत तर होणारच आहे शिवाय त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव व्हावी व बाबासाहेबांसारखे विद्यार्थी तयार व्हावे हा हेतू हेल्पिंग हँड्स चा या उपक्रमामागे आहे.

     “एक वही एक पेन” या उपक्रमाला हेल्पिंग हँड्स, भद्रावती मधील सतत योगदान व सहकार्य करणारे सुकेशनी मानकर, सोनल उमाटे, प्राची वेल्हेकर, कृतांत साहारे, सागर निरंजने, अनिकेत बांबोडे, रीता सहारे, स्नेहा सातपुते, राजरत्न पेटकर, वैभव रामटेके, मनोज पेटकर, वैभव मानकर, तुषार दुर्गे, प्रणय कांबळे, वैभव पाटील, पंकज शेंडे, आदर्श मेश्राम, भाग्यश्री शेंडे, सोनू सिंग, संकेत चीमुरकर, स्वप्निल बनकर, प्रशांत सातपुते, हर्षदा हिरादेवे, दीपक कावटे, जया सपाटे, पवन दासलवार, स्वप्निल मत्ते, अंकित तोडे, कैश शेख, निखिल उंबरकर, श्वेता उंबरकर, आशिष मल्लेलवार व इतर सर्वांनी मोलाचे योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये