ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लसाकम मार्फत गुणवंतांचा सत्कार व शैक्षणिक साहित्याचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

 लहूजी साळवे कर्मचारी महासंघ जिवती च्या वतीने लसाकम जिल्हा सचिव डॉ कुलभूषण मोरे यांच्या संकल्पनेतुन संपूर्ण जिल्ह्यात गुणवंतविद्यार्थी व नवनियुक्त कर्मचारी यांचे सत्कार करण्यात येत आहे. या प्रसंगी जिवती येथे रामकिसन गायकवाड, केंद्र प्रमुख केंद्र वणी (बू) व तसेच गुणवंत विद्यार्थी कू अश्विनी बालाजी कांबळे निर्स एस एस हॉस्पिटल ठाणे, कू वैशाली बालाजी कांबळे एस पी महाविद्यालय चंद्रपूर, कु स्मितल बालाजी कांबळे, जि एन एम अकोले,नगर यांचा सत्कार करण्यात आला. व तसेच सौ. यशोदा राजाराम घोडके यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमात लसाकमचे अध्यक्ष आर. के.घोडके, सहसचिव रवी जेवाले स.सल्लागार डॉ.अनिल दुर्गावाड, प्रा.अंगद गायकवाड, संघटक माधव पट्टेवाले संपर्क प्रमुख, मिथुन गायकवाड व तसेच बळीराम भालेराव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवी जेवाले यांनी केले, मार्गदर्शन रामकिसन गायकवाड केंद्रप्रमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन राजाराम घोडके तालुका अध्यक्ष लसाकम यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये