ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

विकासाकरीता घेतलेले जनतेचे कर्ज व्याजासह फेडले – ना.मुनगंटीवार

मिञ परीवाराच्या वतीने नागरी सत्कार संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

 अर्थमंत्री असताना राज्याच्या विकासकामांसाठी जनतेकडुन जे कर्ज मी घेतले होते ते कर्ज व्याजासह परत केलेले आहे, आपण जो प्रेम माझेवर दाखविला, त्या प्रेमाचेही कर्ज मी व्याजासह परत करेन असे उदगार राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधिर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
स्थानिक सुभाष प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजीत सुधीरभाऊ मुनगंटीवार मिञ परीवाराच्या वतीने आयोजित नागरी सत्कारा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे, महामंत्री नामदेव डाहुले, भाजपा महिला प्रदेशच्या महामंत्री अल्का आत्राम, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष आणि सुधिरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचे संयोजक अविनाश जगताप, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल चुधरी, गजानन वल्केवार, सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, भाजपाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत आष्टणकर, भाजपा ओबीसी सेलचे प्रशांत बोबाटे, अजय गोगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजित नागरी सत्काराचा कार्यक्रम अयशस्वी व्हावा म्हणुन अनेकांनी प्रयत्न केले परंतु चांगले काम करणा-याच्या मागे परमेश्वर सुध्दा राहतो, यामुळे होत आसलेला नागरी सत्कार चांगल्या वातावरणात, उत्तम घडवुन आणला आहे, याबद्दल ना. मुनगंटीवार यांनी आयोजकांचे आभार मानुन नागरीकांचे कामे पुर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध संस्था, संघटनेच्या वतिने ना. सुधिर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप यांनी केले संचालन मुनिराज कुटे यांनी तर उपस्थितांचे आभार अमोल चुधरी यांनी मानले. कार्यक्रमाला हजारो नागरीकांची उपस्थिती होती.

राज्य मंञीमंडळात दुसऱ्यांदा वर्णी लागल्यानंतर तब्बल एका वर्षानंतर पार पडलेल्या ना. मुनगंटीवार यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाला भाजपाच्या प्रमुख पदाधिका-याशिवाय भाजपाचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. त्यामुळे संपन्न झालेल्या सत्कार समारंभाविषयी भाजपा वर्तुळात नाराजी असल्याचे दिसुन आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये