ताज्या घडामोडी

शरद पवार व राऊत बंधुंनाही जिवे मारण्याची धमकी – ट्विटर वरून आली दाभोळकर करण्याची धमकी

आ. सुनिल राऊत ह्यांना फोनवरून धमकी आल्याची माहिती

 

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी ह्यांना जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर आता राज्यातील राजकारणातील मोठे नाव असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व खा. संजय राऊत व आ. सुनिल राऊत ह्या बंधुंनाही जिवे मारण्याची धमकी मिळाल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे.

खा. शरद पवार ह्यांना एका ट्विटर अकाऊंट वरून तुमचा दाभोळकर करू अशा आशयाची धमकी देण्यात आली. काही वर्षांपुर्वी नरेंद्र दाभोळकर ह्यांना जिवे मारण्यात आले होते आणि त्यांच्या मारेकऱ्यांवर न्यायालयात खटला सुरू आहे हे विशेष.

खा. शरद पवार ह्यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर खा. सुप्रिया सुळे ह्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना धमकी बाबत माहिती दिली व खा. शरद पवार ह्यांची सुरक्षा तसेच धमकी देणाऱ्याचा तपास करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली.

दुसरीकडे काल संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना आ. सुनिल राऊत ह्यांना फोन करून अज्ञात इसमाने सुनिल राऊत व खा. संजय राऊत ह्यांना मारण्याची धमकी दिल्याची माहिती खुद्द राऊत बंधूंनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये