ग्रामपंचायत आष्टा व वनविभाग ताडोबाच्या वतीने महास्वच्छता अभियान संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील ग्रां. पं. आष्टा व वनविभाग ताडोबाच्या संयुक्त रित्या मौजा आष्टा येथे दि 11 फेब्रुवारी 2025 ला प्लास्टिक निर्मूलन व महास्वच्छता अभियान नुकतेच राबविण्यात आले.
या महास्वच्छता अभियानात समस्त आष्टा ग्रामवासिंनी आपल्या परिसराला स्वच्छ करून माझे गाव सुंदर गाव करण्यात अथक परिश्रम केले.
या महास्वच्छता अभियानात विनय गौडा जिल्हाधिकारी, रेड्डी उपवनसरक्षक कोर चंद्रपूर, राजेश भांडारकर तहसीलदार भद्रावती, आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी भद्रावती, चिवंडे वनपरीक्षेत्र अधिकारी ताडोबा, प्रणाली भागवत विस्तार अधिकारी, कामटकर वनपाल आष्टा, नन्नावरे वनपाल भानुसखिंडी, भरत राठोड ग्रामपंचायत अधिकारी आष्टा, हेमंत मेहेर ग्रामपंचायत अधिकारी, थुल पं. स. भद्रावती पुरामशेट्टीवार मॅडम SBM पं. स. भद्रावती, दडमल मंडळ अधिकारी मुधोली, सौ. टिपले तलाठी आष्टा, चांगदेव रोडे सरपंच आष्टा, सुरेखा अहिरकर उपसरपंच आष्टा, नंदकिशोर आत्राम सदस्य आष्टा, सुहास बहिरे पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचारी तथा गावातील गावकरी व शाळेतील विद्यार्थी यानी आपला सहभाग दर्शविला होता.