ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नकोडा गावातील अवैध भंगार दुकाने बंद करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर): नकोडा गावात अवैधरित्या भंगार दुकाने चालवल्या जात असून त्यामुळे गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः तरुण वर्ग हा लवकर पैसा कमावण्याच्या नादात या अवैध व्यवसायाकडे आकर्षित होत आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, स्थानिक नागरिकांनाही या समस्येमुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामपंचायत कार्यालय, नकोडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे. तसेच, माजी ग्रामपंचायत उपसरपंच मोहम्मद हनीफ यांनी देखील पोलिसांना निवेदन देऊन प्रशासनाकडे मागणी केली आहे की या अवैध भंगार दुकाने त्वरित बंद करण्यात यावीत. संबंधित प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.