Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

आमदाराचा फोन गेला, अन् विद्यार्थांना मिळाली बस.

खूप वेळेपासून होते गडचांदूर बस स्थानकावर ताटकळत.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

विकासाचा नारा देत देवराव भोंगळे यांनी निवडणूक लढवली आणि आमदार झाले निवडणुकी दरम्यान त्याचा प्रत्येक सभेत त्यानी विकासात्मक दृष्टीने पाऊल टाकन्याचे आणि जनतेचा समस्याचे निवारन करण्याचे आश्वस्त केले. याचीच प्रचिती आमदार झाल्यावर दिसून येत असून निमनी येथील मुल गडचांदूर येथे बस करिता ताटकळत असल्याचे एका युवकाने फोन करून सांगितले आमदाराने फोन लावताच लगेच दहा मिनिटात बस आली. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा तर मिळाला थंडीचा दिवसात लवकर घरी पोचल्याने पालक सुद्धा आनंदी झाले.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील निमनी येथील अंदाजे ३० मुले ही शिक्षणा करिता गडचांदूर येथे जातात. परंतू विद्यालय सुटले की ते बस अभावी ते नेहमीच गडचांदूर बस स्थानकावर ताटकळत राहतात. ही बाब नित्याचीच त्यामुळे त्यांना नाहक त्रासही सहन करावा लागतो आज देखील तीच अवस्था मुलांची झाली होती एकीकडे थंडीचा पारा चढला असताना दुसरी कडे घरी जाण्याची ओढ या परिस्थितीत त्यांना फक्त बस येण्याची आस लागली होती. परंतू बस काही येईना शेवटी गावातीलच एक युवक बस स्थानकाकडे गेला असता त्याला विद्यार्थी उभे दिसले त्याने थेट आमदार लाच फोन लावून सांगितले त्यानी देखील विलंब न करता अवघ्या दहा मिनिटात बस उपलब्ध करून दिली आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला त्यांचा चेहऱ्यावर आमदाराने बस पाठविली याचा आनंद देखील जाणवत होता.

महिना व्हायचा आत आमदाराने कामाचा झपाटा लावला असून नेहमीच फोन वर उपलब्ध असल्याने ते समस्याचे लगेचच निवारण करीत असल्याची प्रचिती या माध्यमातून दिसून येत आहे त्यामुळे कर्तव्यदक्ष व नेहमी उपलब्ध असलेले आमदार आपल्याला मिळाल्याची जनमाणसात चर्चा आताच सुरू झाली आहे.

(मी बस स्थानकावर गेलो असता तिथे गावातील विद्यार्थी दिसून आली विचारणा केली असता बस अभावी ते तिथेच उभे असल्याचे सांगितले लगेच आमदारांना फोन करून कळविले तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून दिली

सचिन पिदूरकर निमणी)

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये