ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटर सायकल चोरट्यांना सेवाग्राम पोलीसांनी केली अटक !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- सेवाग्राम पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या सौरभ गोविंदा कापटे रा. वरुड त. जि.वर्धा यांनी त्यांच्या मालकीची मोटार सायकल दि. 15/ 8/2024 रोजी वेळ सायंकाळी 7 वाजता घरासमोर उभी ठेवली असता मोटार सायकल (हिरो होंडा प्लस गाडी क्र. एम.एच. 32 आर. 8913 किंमत अंदाजे तिस हजार रूपये) चोरी गेल्याचे लक्षात येता कापटे यांनी दि.16/ 08/ 2024 दुपारी 4 वा. 25 मी. तोंडी तक्रार सेवाग्राम पोलीस ठाण्यात दिली असता सेवाग्राम पोलीसांनी अप क्र. 627/24कलम 303 (2) BNS गुन्हा नोंद केली असता

अज्ञात आरोपीने मोटर सायकल चोरी केल्याची पो. स्टे. ला तक्रार प्राप्त झाल्याने. फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर गुन्ह्यातील आरोपी क्र.1) पंकज सुरेशराव भोयर वय 32 वर्ष, धंदा मजुरी रा. गाडगेनगर मसाळा ता. जि. वर्धा 2) अजय शंकरराव तेले वय 40 वर्ष, धंदा मजुरी रा. अंबरकर ले आऊट वरूड ता. जि. वर्धा . यांचा शोध घेऊन त्यांना सखोलविचारपूस केली असता त्यांनी संगनमताने सदर मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपीच्या ताब्यातून मोटर सायकल होंडा स्प्लेंडर प्लस क्र. एम. एच. 32 आर. 8913 कि. 30,000/- रू. ची जप्त करण्यात आली. सदर कारवाई सेवाग्रम ठाण्याचे ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात पोना. प्रकाश झाडे पोहवा. हरिदास काकड, पोना, गजानन कठाणे अभय इंगळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये