ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिपरी पुनर्वसन ग्रामपंचायत मध्ये पार पडला गुणवंत विद्यार्थींचा गौरव सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पिंपरी पुनवर्सन ग्रामपंचायत मध्ये पार पडला गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा ग्रामपंचायत कार्यालया तर्फे देण्यात आले मुलांना प्रोत्साहन अनुदान सरपंच राजेश शिरगरे उपसरपंच सचिन दहाट शैलेश तलवारे यांनी दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते.

कार्यक्रमाला दहावी व बारावी च्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये१) कल्याणी नरेश टेटू ही 95% घेऊन नोबेल किड्स कॅंन्वेटला प्रथम आली विद्यार्थी २)कल्याणी दिलीप वायरे 93.65% बारावी ३)संस्कार राहुल काळे ८१ % दहावीचा विद्यार्थी ४) रेहान खान शाहरुख खान पठाण 80% बारावीचा विद्यार्थी ५) रितेश राजेश कावळे ८१% दहावीचा विद्यार्थी ६)विवेक दिनेश वायरे 82% दहावीचा विद्यार्थी या विद्यार्थ्यांना कार्यक्रम प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. मुलांना संविधानाची प्रत प्रोत्साहन अनुदानाचा चेक तसेच बुके देऊन सन्मानित करण्यात आले. तत्प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आर्मी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलमताई बाबर .ज्येष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश भट्टड पोलीस कर्मचारी रोशन करलुके. यांची उपस्थिती होती. पाहुण्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की यशस्वीतेच्या उच्च शिखरावर जाण्याकरिता मेहनत. कष्ट. जिद्द. चिकाटी .या सर्व गुणांची सांगड घालूनच प्रगतीपथावर पाऊल ठेवता येतं.व भविष्यामध्ये शिक्षणाची दिशा टिकविण्याकरिता एकाग्रचित्त पणे पाऊल टाकणे गरजेचे आहे. व तसे आपणा सर्वांना मार्गक्रमण करावे लागेल.

तसेच मुलांना सामाजिक व सांस्कृतिक व समाज उपयोगी जबाबदारीचे भान सुद्धा ठेवण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व भविष्याच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी सरपंच यांनी सुद्धा मुलांना भविष्यातील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे संचालन प्रशांत हेरोडे यांनी केले.तत्प्रसंगी गावातील मोठ्या प्रमाणात महिला मंडळी तसेच नागरिकांची उपस्थिती होती शहादत खान पठाण. ममता टेटू. सुरेखा वायरे. राहुल काळे. अनिल माने. रेखा कावळे.सविता ठेवले. जयश्री तलवारे. शारदा लवटे. कविता मात्रे. मिलिंद कावळे .शेख अन्वेष. वसंत मंडवे. महेंद्र म्हात्रे. रंजना काळपांडे. अनु दहाट. शकुंतला भगत. इत्यादींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये