ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरधाव दुचाकी उड्डाण पुलाच्या भिंतीला धडकली

एकाचा मृत्यू, दोघे जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           टिबल सीट असलेली भरदार दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा घटनास्थळीत मृत्यू झाला असून दोघे युवक गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना दिनांक ५ रोज बुधवार ला रात्रो अकरा वाजता शहरातील हायवे वरील उडान पुलाजवळ घडली. जखमी दोन्ही युवकांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

अमोल भिंगारदिवे वय 22 वर्ष,सुजल बहादे व लहू धोटे हे तीन युवक नंबर प्लेट नसलेल्या एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने शहरातील पंचशील नगरातून हायवे कडे भरधाव वेगाने जात असताना सदर दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला आदळली. या अपघातात अमोल भिंगारदिवे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुजल बहादे व लहू धोटे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.

त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये