मुलानेच केला बापाचा खून देवळी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
पो.स्टे.देवळी डी..बी.पथकाची मोठी कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी नामे गणपत चंदूजी कुरवाडे रा. देवळी दि. 4.2.2025 रोजी तक्रार दिल्ली की त्यांचा भाऊ नामे नारायण चंदूजी कुरवाडे याने त्याचे पत्नीसोबत वाद केल्याने मृतकाचा मुलगा नामे नारायण कुरवाडे यास राग आल्याने त्याने घरी असलेल्या लाकडी काडीने मृतकाचे डोक्यावर मारून जबर जखमी करून जीवांशी ठार केले आहे असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्ट देवळी येथे अपराध क्रमांक 96/25 कलम 103 बीएनएस अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी डी बी पथकाची टिम रवाना करण्यात आले खून तीन आरोपी एका शेतात लपवून असल्याचे माहीती मिळताच डि बी पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन देवळी येथे आणण्यात आले.
हि कार्यवाही पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देवळी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे डि बी पथकाचे पोलिस हवालदार कुणाल हिवसे नितीन तोडासे गणेश इंगळे मनोज नपटे सागर पवार यांनी वर्धा न्यायालयात हजर केले व त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्पेश मगरे पुढील तपास करत आहे.