नदीच्या पात्रातून रेती (गौण खनिज) ची चोरटी वाहतूक
ट्रॅक्टर चालक-मालक वर कारवाई करून एकूण 7 लाख 5 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर असे की, आजरोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने पो.स्टे. तळेगाव हद्दीत मुखबीरचे खबरेवरून नाकाबंदी केली असता यातील आरोपी चालक हा मालकाचे संगणमताने बाकली नदीच्या पात्रातून विना पास परवाना रेती चोरून रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील र्ट्रॅक्टर ट्रॉली, रेती असा एकूण एकूण जु.किं. 7,05,000 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी 1) मोहन रामभाऊ वरठी, वय 26वर्ष, रा. तळेगाव, तह. आष्टी जि वर्धा (चालक)b2) मालक – फिनसिंग टाक, रा. तळेगाव , तह. आष्टी , जि. वर्धा, (पसार)bविरूध्द पो.स्टे. तळेगाव येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पो.नि.विनोद चौधरी,यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो.अं. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.