ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतीचे अनुदानाची रक्कम मिळवून देतो असं म्हणत अर्थिक फसवणूक

अज्ञाताविरूद्ध गून्हा नोंद ; गुन्ह्यातील वाहन जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन देवळी येथे फिर्यादी नामे पार्वताबाई शंकरराव किनेकार रा.रोहणी यांना आरोपी यांनी शेतीचे अनुदानाचे एक लाख रुपये मिळवून देतो असे सांगून 2,15000 रुपये घरून नेऊन फिर्यादीची फसवणूक केल्याचे रिपोर्ट वरून दिनांक 03.02.2025 रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध अप.क्र.कलमः- 94/2025 कलम 318(4),2043(5)BNS गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला होता.

मा.पोलीस अधीक्षक साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब,मा.सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब उपविभाग पुलगाव, यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे ठाणेदार देवळी, पोलीस हवालदार कुणाल हिवसे, नितीन तोडासे, गणेश इंगळे मनोज नप्ते, सागर पवार यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे रामराव भीमराव ढोबळे, रा.तिवसा जि. अमरावती यास सदर गुन्ह्यात दि. 4/2/25 रोजी अटक करून आरोपीकडून फसवणूक केलेल्या रकमेपैकी 30,000 रुपये व गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल जप्त केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजभिये करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये