चंद्रपुरमध्ये पद्मश्री मंदकृष्ण मादिगा यांचा भव्य सन्मान

चांदा ब्लास्ट
दि. 6 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्रपुर जिल्ह्यातील नकोडा गावात पद्मश्री मंदकृष्ण मादिगा यांच्या सन्मानार्थ भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेवर दूध अभिषेक (पालाभिषेक) करून उत्साहात त्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला दासारपु नागराजू, दासरी शंकर, ताल्लपेल्ली रामुलू, ताल्ला चंद्रैया, रासपेल्ली रमेश, रामसका राजू, कादासी कनकय्या, येदुला तिरुपती, लिंगमपल्ली प्रभाकर, तांड्रा राजन्ना, लिंगमपल्ली विक्की, मल्लारपू श्रीनिवास, मंत्री शंकर, कनकम प्रशांत, दासारपू देवय्या, माइसा स्वामी, कुटला धनराज, ताल्लापेल्ली लक्ष्मण, कोंड्रा नर्सिंग, गाजुला ओदेलू, गाजुला रमेश, माइसा प्रशांत, नागेश पताडे, नरेश कोदाटी, कनकम विक्की, कनुकुटला कपिल, सुधाकर अंबाला, कुमार एलुकापेल्ली, नरेश कोम्मू, दास बासमपेल्ली, यादय्या महंकाली, श्रीनिवास यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
हैदराबादमध्ये मादिगा समाजाची भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रम
मादिगा समाजाच्या एससी वर्गीकरणाच्या मागणीसाठी हैदराबादमध्ये एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता एलबी स्टेडियमपासून सुरू होऊन मोठ्या आंबेडकर प्रतिमेपर्यंत जाईल. या रॅलीत हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होतील.
या आंदोलनाचे आयोजन मादिगा रिझर्वेशन पोऱाटा समिती (MRPS) यांनी केले असून, या प्रसंगी समाजाच्या नेत्यांनी सरकारकडे एससी वर्गीकरण लवकरात लवकर लागू करण्याची मागणी केली आहे. या रॅलीत लाखो लोकांचा सहभाग, हजारो आवाज आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत.
या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यात नवचैतन्य संचारले असून सरकारकडून न्यायाची अपेक्षा अधिक दृढ झाली आहे.