कार व दुचाकीच्या धडकेत एक ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज दि. ३० जानेवारी रोजी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली आहे.
यामध्ये ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव अशोक फकिरा जनबंधु वय ६२ वर्ष रा मेंडकी तह. ब्रम्हपूरी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी ग्राम पंचायत सदस्य अशोक जनबंधु हे आपल्या मुलीच्या गावी तळोधी खुर्द येथे गेले होते. तिथून ते मेंडकी कडे परत जात असतांना समोरून येत असलेल्या कारने दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. यामध्ये आरोपी चारचाकीवाहन चालकाचे नाव आदीत्य हांडेकर वय २१ वर्ष रा. गोविंदपुर तह. नागभीड असे आहे.
घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपूरी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनाकरिता ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.