हिंगणघाट हद्दीत आरोपीतांवर जुगार कायद्यान्वाये रेड
एकूण 2 लाख 10 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैध धंद्यावर कारवाईची मोहिम राबवून पो.स्टे. हिंगणघाट हद्दीत मुखबीरचे खबरेवरून वरील नमुद घटनास्थळी आ.क्र. 1) सुरेश किसन गायकवाड, वय 37 वर्ष, रा. गौतम वार्ड हिंगणघाट, याचे व्हिडिओ गेम पार्लरवर जुगार रेड केला असता, नमुद सर्व आरोपी हे व्हिडिओ गेम पार्लरमधील ईलेक्ट्रॉनिक मशिनवर संगणमताने नगदी पैशांच्या स्वरूपात रक्कम स्वीकारून त्या मोबदल्यात 10 ईलेक्ट्रॉनिक मशिनवर चाबी भरून, मशिनवर येणा-या फिरत्या आकड्यांवर स्वतःचे फायद्याकरीता पैशाची पैज लावुन मशिनवर हार-जितचा जुगार खेळत असतांना मोक्यावर रंगेहाथ मिळुन आल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपी 1) सुरेश किसन गायकवाड, वय 37 वर्ष, रा. गौतम वार्ड हिंगणघाट, 2) मनोज सुर्यभान येरमे, वय 40 वर्ष, रा. विर भगतसिंग वार्ड हिंगणघाट, 3) गोविंद करमचंद सौदे, वय 32 वर्ष, रा. स्विपर कॉलनी हिंगणघाट, 4) रविंद्र विठ्ठलराव हुर्स्ले, वय 38 वर्ष, रा. डांगरी वार्ड हिंगणघाट, 5) ताज खान मुन्नवर खान, वय 33 वर्ष, रा. निशानपुरा वार्ड लोकमान्य टिळक शाळेजवळ हिंगणघाट यांच्या ताब्यातून 1) व्हिडिओ गेम पार्लरमधील 10 ईलेक्ट्रॉनिक मशिन त्यांचे चाब्यांसह (ज्यात एम.28, मेट्रो, हाय फाईव्ह, क्रेझी बोनस, सिक्स लाईनर, मास्टर, हॉलिडे, व्हिंग्स, मिंट, हेलो विन, अशा कंपनीच्या मशिन आहे.) प्रती मशिन कि. 20,000 रू प्रमाणे एकुण कि. 2,00,000 रू. 2) 09 प्लास्टीक स्टूल प्रती नग 300 रू प्रमाणे एकुण कि. 2,700 रू 3) नगदी 6,350 रू 4) एक मोटोरोला कंपनीचा कि-पॅड मोबाईल कि. 1,500 रू असा जु.किं. 2,10,550 रू चा मुद्देमाल नमुद वर्णनाचा जु.किं. 2,10,550 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पो.नि.विनोद चौधरी,यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनि. प्रकाश लसुंते, पो. हवा. नरेंद्र पाराशर, अरविंद येनुरकर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.