Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

आठ तासात लावला पंधरा वर्षापुर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वरील माहीती वरुन अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, वर्धा, नी वर्धा जिह्यातील मिसींग ग्रुप वर सदर माहीती व मुलीचा फोटो प्रसारीत करुन माहिती मागवली व तसेच स्वतः पोलीस स्टेशन सेवाग्राम, रामनगर, सावंगी मेघे, वर्धा शहर येथील सन 2005 पासुन चे सन 2020 पावेतो चे मिसींग रजिस्टर चेक करुन कविता नावाची महिला व तिचे सोबत ईशा नावाची मुलगी मिसींग आहे काय याची बारकाईने पाहणी केली असता, पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे सन-2010 मध्ये मिसींग क्र. 40/2010 दि.26/03/2010 प्रमाणे सौ. कविता राजेंद्र ढोके वय 28 वर्षे व तिचे सोबत मुलगी कु. ईशा राजेंद्र ढोके वय 10 वर्षे दोन्ही रा. दयाल नगर वर्धा असे फिर्यादी राजेंद्र पांडुरंग ढोके वय 32 वर्षे रा. दयाल नगर वर्धा यांचे तक्ररी वरुन मिसींग दाखल असल्याची नोंद मिळाली. AHTU चे तिन्ही कर्मच्या-यानी अत्यत बारकाईने अथक परिश्रम घेवुन सदर फिर्यादी राजेंद्र ढोके यांचे घराचा मुलीने ओटक दिलेल्या माहिती वरुन शोध घेवून पत्ता शोधला. सदर मिसींग मुलगी कु. ईशा व सदर मुलीचे भाउ, मामा, मोठे वडील, चुलत बहिण, चुलत भाउ यांचे सोबत एकञ व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे बोलणे करुन दिले व सर्वानी एकमेकांना ओळखले व मिसींग मुलगी ही ईशा ऊर्फ छकुली राजेंद्र ढोके हीच असल्याचे निष्पन्न झाले.

सदरची कार्यवाही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, डॉ. सागर कवडे, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनामध्ये पो.नि. विनोद चौधरी, स्थागुशा वर्धा, स. फौ. सुभाष राउत, पो.हवा. नितेश मेश्राम, पो.शि. नवनाथ मुंडे सर्व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, वर्धा, यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये