Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ऑपरेशन मुस्कान मोहीम अंतर्गत 15 वर्षानंतर झाली कुटुंबाची भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा पोलीस यांनी ऑपरेशन मुस्कान 13 ही मोहीम राबवुन 15 वर्षापुर्वी हरवलेल्या मुलीचा छडा लावुन त्यांच्या कुटुंबियांची भेट घडवुन आणली.

दि. 18/12/2024 रोजी नियंत्रण कक्ष, वर्धा येथे सोनीपत ता. जि. पानिपत राज्य हरियाना येथुन स. फौ. राजेश कुमार यांनी फोन व्दारे माहीती दिली की, एक ईशा नावाची मुलगी वय 21 वर्षे ही सोनिपत येथे राही आश्रम मध्ये राहत असुन तो सांगते की, मी वर्धेची आहे. तिचा शोध घ्यावा, या वरुन अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, वर्धा येथील यांनी स.फौ. राजेश कुमार (हरियाना) यांचे मोबाईल क्रमांकावर व्हिडीओ कॉल करुन सदर मुलीसोबत बोलणी केली असता, तिने आपले नाव ईशा ऊर्फ छकुली असे सांगुन आईचे नाव कविता व वडीलांचे नाव चिंधु व भावाचे नाव अनिकेत असुन मी वर्धेची आहे. माझ्या मोहल्यात एक निळया रंगाचे मुलामुलींचे सरकारी हॉस्टेल आहे.

जवळच दोन सरकारी शाळा आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. असे सांगुन माझी आई कविता हिने बरेच वर्षापुर्वी मी लहान असतांना आसाराम नावाच्या ईसमासोबत वर्धेवरुन सोनिपत हरियाणा येथे पळवुन आणले होते व तेथुन काही वर्षानी माझी आई कविता हिने मला व आसाराम नावाच्या ईसमाला सोडुन ती दुस-या कोणत्यातरी ईसमासोबत कोटे तरी निघुन गेली. त्या नंतर काही दिवसांनी मला लोकांनी व पोलीसांनी राही आश्रम सोनिपत हरियाणा येथे आणुन सोडले व मी तेव्हापासुन मी तेथे राहत आहे व बी.ए. व्दितीय वर्षाला शिकत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये