ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाकेबंदी दरम्यान कारसह देशी व विदेशी दारू जप्त

एकूण 5 लाख 64 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 21/01/2025 रोजी रात्र दरम्यान स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक हजर असताना मुखबीर कडून खबर मिळाली की मयूर मद्रीले रा स्नेहल नगर वर्धा हा पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार एम.एच.32 .सी.6853 नंबरच्या कारने देशी व विदेशी दारू चा माल आष्टा गावाकडून बरबडी मार्गे आपल्या राहत्या घरी घेऊन जात आहे.

अशी माहिती मिळाल्याने त्यांच्यावर नाकेबंदी करून प्रो. रेड केला असता आरोपी नामे मयूर मद्रीले रा स्नेहल नगर वर्धा हा आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट क्रमांक एम एच 32 सी 6856 कार मौक्यावर सोडून पसार झाला. पसार आरोपीच्या ताब्यातील एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट व्हीडीआय कार क्रमांक एम एच 32 सी 6853 व देशी विदेशी दारू असा एकूण 5,64,400/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला, पसार आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकर,पोलीस अंमलदार हमीद शेख, सचिन इंगोले, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे रामकिसन ईप्पर, अरविंद इंगोले, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये