Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

तिरवंजा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव

विविध कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         तालुक्यात ग्रामीण भागातील सर्वात मोठा महोत्सव समजल्या जाणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या महोत्सवाचे आयोजन तिरवंजा येथे करण्यात आले.दोन दिवसीय चाललेल्या या पुण्यतिथी महोत्सवात विवीध धार्मिक तथा सामाजीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात राष्ट्रसंतांच्या पुतळ्याचे अभ्यंगस्नान, ग्रामसफाई अभियान, घटस्थापना, भजन,किर्तन आदी कार्यक्रमांचा समावेश होता. याशिवाय गावातून भव्य रामधुन शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत परीसरातील ७२ भजन तथा दिंड्या तथा गावकरी सहभागी झाले होते.

महोत्सवादरम्यान महिलांसाठी हळदकुंकू तथा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात मान्यवरांनी महिलांना अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.गायीका सिमरन ऊईके यांच्या गायनाने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले.याशिवाय महोत्सवात किर्तनकार ह.भ.प.संदिप पाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक किर्तनाचे आयोजन करण्यात आले. ऊपस्थीत मान्यवरांनी यावेळी गावकऱ्यांना विवीध विषयांवर मार्गदर्शन केले.

शेवटी महाप्रसादाने महोत्सवाची सांगता करण्यात आली. महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.महोत्सवाला परीसरातील गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये