मास्टर कॉलणी, वर्धा येथील रमाई आंबेडकर उद्यानातील बुद्ध विहारामधुन चोरी गेलेली मुर्ती पोलीसांनी परत मिळविल्याने पोलीसांमार्फत केली भगवान गौतम बुद्धाचे मुर्तीची स्थापणा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 28.10.2025 ते दि. 29.10.2025 रोजी चे रात्रदरम्यान वर्धा शहरातील मास्टर कॉलणी रहिवासी परीसरात असलेल्या रमाई आंबेडकर उद्यानातील बुद्ध विहारामध्ये असलेल्या अंदाजे 5 किलोग्रॅम वजनाची भगवान गौतम बुद्धाची पितळी मुती कि. 6000 रू ची कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरी केल्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस निरंतर अज्ञात आरोपीचा शोध घेत आरोपी नामे श्रावण कृष्णाजी खाकरे वय 64 वर्ष रा. राजापेठ, हुडकेश्वर रोड, नागपुर ह.मु. जुना पुलगाव, गजानन मंदीराजवळ, पुलगांव हयास ताब्यात घेवुन त्याचे घरझडतीत चोरी गेलेली गौतम बुद्धाची मुर्ती मिळुन आल्याने जप्त करण्यात आली होती. सदर भगवान गौतम बुद्धाची मुर्ती पोलीस स्टेशन वर्धा शहर येथुन बुद्ध विहाराचे कमेटीला सुपुर्त केल्याने कमेटीचे सदस्यांनी भगवान गौतम बुद्धाचे मुर्तीची पोलीस निरीक्षक श्री संतोष ताले साहेब यांचेहस्ते स्थापणा करण्याचा आग्रह केल्याने दिनांक 04.12.2025 रोजी सकाळी 11.00 वा. चे सुमारास मा. पोलीस निरीक्षक संतोष ताले, पो.उप.नि. शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्म, अभिजीत वाघमारे, प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे तसेच बुद्ध विहार कमेटीचे सदस्य नरेश म्हैसकर, विजय नाखले, अशोक मुद्रे, अनुसया धोंगडे, रत्नमाला वाघमारे, विजय खांडेकर, ताकसांडे ताई, पाटील ताई यांचे उपस्थितीत भगवान गौतम बुद्धाचे मुर्तीची स्थापणा करण्यात आली.
रमाई आंबेडकर उद्यानातील भगवान गौतम बुद्धाची मुर्ती चोरी गेल्यामुळे लोकांच्या धार्मीक भावना दुखावल्या होत्या परंतु पोलीसांनी आरोपीचा शोध घेवुन चोरी गेलेली भगवान गौतम बुद्धाची मुर्ती परत मिळविल्याने परीसरात पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीबाबत चर्चा होत असुन सगळीकडे आनंदाचे वातावरण दिसुन आले. कमेटीचे सदस्यांनी पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.



