नारंडा येथील भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
भा.ज.पा. युवा मोर्चा चे आशिष ताजने यांना धक्का

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचांदूर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये नारंडा येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते अरूण बोळे, नामदेव हेपट, बजरंग पेटकर, सुभाष डवरे, अनिल मालेकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. आ. सुभाष धोटे यांनी कॉंग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले.
आ. सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक विधायक कार्य केलेले आहे. नारंडा येथे अनेक कामे मंजूर केली. म्हणून आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप युवा मोर्चा चे आशिष ताजने यांना धक्का त्यांच्याच गावात धक्का बसला आहे.
यावेळी सिडीसीसी बँक चे संचालक विजय बावणे, तालुका अध्यक्ष उत्तम पेचे, सुरेश मालेकर, मिलिंद ताकसांडे, प्रकाश मोहूर्ले, मुर्लीधर बलकी उपस्थित होते.