ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त जेष्ठ लिपिक नत्थूजी हेपट यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

श्री.नत्थुजी पा. हेपट (सि.क्लर्क, डब्ल्यू सी एल पोवनी ओपन कास्ट) विभागातून नियत वयोमानानुसार 30/09/2023 ला सेवानिवृत्त झाले त्याचे औचित्य साधून हेपट परिवारातर्फे षष्ठीप्तापूर्ती व सेवानिवृत्ती अभिष्टचिंतन सोहळाचे आयोजन 8 ऑक्टोबर ला करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.संतोष देठे (मराठी विभाग प्रमुख, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा) होते.

तसेच प्रमुख अतिथी म्हणून स्मिताताई अनिलराव चिताडे (प्राचार्या,महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर ),  प्रा. डॉ. अनिलराव चिताडे (विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा संचालक ग. शि. प्र. मं. गडचांदूर),धनंजय गोरे (सचिव, ग. शि.प्र.मंडळ गडचांदूर ) राहुल मारोतराव बोढे (संचालक, ग. शि. प्र. मं. गडचांदूर, श्री.प्रफुल्ल माहूरे (उपप्राचार्य म.गांधी कनिष्ठ.महा.गडचांदूर), शंकर पा. हेपट, सास्ती ओपन कास्ट, नानाजी पा. हेपट विभागातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कारमूर्ती नत्थुजी रामाजी हेपट यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सौ. स्मिताताई चिताडे (प्राचार्या, म. गांधी वि.तथा क. महा.गडचांदूर यांना २०२३ चा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हेपट परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच श्री.प्रा.डॉ.संतोष देठे ( शिवाजी महाविद्यालय राजुरा) यांना ‘क्रांतीदर्शी तुकाराम’ या समीक्षाग्रंथास २०२१ चा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हेपट परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला व परिवारातर्फे मनोगत प्रा. नरेंद्र हेपट व श्री.नागेश्वर हेपट यांनी व्यक्त केले. सर्व उपस्थित पाहुण्यांनी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. बाळू उमरे यांनी केले व आभार प्रवीण हेपट यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये