Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बोरमाळा ते सिन्देवाही बसचे वेळापत्रक पूर्वीच्या वेळेनुसार नियमीत करण्यात यावे

विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 एसटीची सेवा गाव तिथे एसटी रस्ता तिथे एसटी या बीद्र वाक्यानुसार खेड्यापासून ते शहरापर्यंत विस्तारलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटी सेवा सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे.

या खेड्यापासून ते शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गांचे हक्काचे साधन म्हणजे एसटी होय परंतु एसटीच्या चुकीच्या बे टाईमशीर वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे कारण की सकाळी बोरमाळा ते सिंदेवाही ही बस पुर्वि बोरमाळ्या वरून सकाळी साडेसहा वाजता सुटत होती परंतू हा टायमिंग बदलवून सकाळी सहावाजता सुटते त्यामुळे सिन्देवाही ला शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थीनींना हि बस मिळत नाही कारण आधी ही बस सात वाजता मेहा ला यायची ति आता सव्वा सहा साडे सहाला येते त्यामुळे थंडीचा दिवसात एवढ्या लवकर विद्यार्थी उठून तयारी करू शकत नाही त्यामुळे त्यांची बस सुटून शाळा बुडते आणि शैक्षणिक नुकसान होते.

सद्या शाळेमधे प्रात्यक्षिक परीक्षा चालू आहेत त्यामुळे बस मिळाली नाही तर विद्यार्थी परिक्षेला मुकतील याकडे प्रशासनाने तसेच ब्रम्हपूरी आगार प्रमुखांनी याकडे लक्ष द्यावे व पूर्वी असलेल्या वेळेनुसारच बस सुरु करण्यात यावी अशी मागणी सरंपच रुपेश रामटेके,अरुन गंडाटे,नासिर कुरेशी, पंकज दळांजे,टानीक नंदेश्वर,प्रमोद कोलते व गावकरी यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये