Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नवभारत विद्यालय व्याहाड बुज येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         ग्रामीण भागात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून माजी खासदार तथा दलित मित्र स्व. वि. तु. नागापुरे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रेरणेने सन 1961मध्ये व्याहाड बुज. येथे नवभारत विद्यालयाची स्थापना करुन शेतकरी, शेतमजुरांच्या मुला/मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली.

      याच विद्यालयात सन 2008_2009 मध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडुन आप आपले नाव लौकिक केलेल्या विद्यार्थ्यानी एकत्र येऊन विद्यालयात स्नेहमिलन सोहळा आयोजित करुन आपले विद्यालयाला काही देणे लागते या विचाराने प्रेरित होऊन गुरुदक्षिणा म्हणुन माजी विद्यार्थी/विद्यार्थीनी एकत्र येऊन वाटर कुलर थंड पाण्याची सोय म्हणुन चाळीस हजार रुपये किंमतीचा वाटर कुलर विद्यालयाला भेट म्हणुन दिला..

        कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मान. संघपाल भगत, प्रमुख पाहुणे म्हणून व्हि.डी. जिरकुंटवार, एम. बी. पठाण, तु. बा. कुनघाडकर, प्रा. संजय गव्हाचे, पि. एल. वनकर, एस. पी मेश्राम, सुरेश फुलझेले, दिपक गद्देवार, वाघोली बुटी चे माजी सरपंच होमनाथ मेश्राम, डाॅ.वैभव कुनघाडकर, तथा नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक/शिक्षिका आणि ईतर कर्मचारी वृंद, पालक वर्ग आजी माजी विद्यार्थी/विद्यार्थीनी फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या स्नेहमिलन कार्यक्रमात जवळपास 100 माजी विद्यार्थी/विद्यार्थीनीने सहभाग नोंदविलेला होता.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रृती रोहणकर, ऐश्वर्य मेश्राम, किशोर बुरे, आणि आभार प्रदर्शन सुधिर ईंदोरकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये