Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वॉकथान फॉर बचपन स्पर्धेचे १२ जानेवारीला आयोजन : स्पर्धेत सहभागी व्हा : डॉ. विवेक शिंदे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दि.१२ जानेवारी रविवारला करण्यात आले आहे. ही स्पर्धा यशवंतराव शिंदे ज्युनिअर कॉलेजच्या पटांगणावर सकाळी ७ वाजता घेण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. विवेक शिंदे यांनी पत्रपरिषदेत दिली.

    मॅराथॉन स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षी वेगळ्या विषयाला हात घालून ही स्पर्धा घेतली जाते. यापूर्वी रन फॉर युनिटी, रन फॉर डॉटर, रन फॉर फ्रेंडशिप, रन फार महाराष्ट्र या नावाने या स्पर्धा पार पडल्या.यावर्षी वॉकथान फॉर बचपन या नावाने ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा मार्ग ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम स्थळ ते जुना बसस्थानक परत कार्यक्रम स्थळ, इतरांना कार्यक्रम स्थळ ते गणेश मंदिर प्रवेशद्वार ते कार्यक्रम स्थळ असा राहील असल्याचे डॉ.शिंदे यांनी सांगितले.

आजच्या मोबाईल युगातील ही नवीन पिढी आपले बालपण विसरत चालले आहे. आधीच्या काळातील मित्रांच्या सहवासातील खेळ, शाळेतील मस्ती या गोष्टींचा नवीन पिढीला जुन्या पिढीकडून उजाळा देण्याचा हा प्रयत्न आहे.

नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा समस्त भद्रावतीकरांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा. असे आवाहन डॉ. विवेक शिंदे यांनी केले आहे. यावेळी संस्थेचे संचालक डॉ.कार्तिक शिंदे, प्राचार्य एल.एस. लडके ,डॉ.जयंत वानखेडे,डॉ.अपर्णा धोटे,अजय आसुटकर आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये