Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महावितरण कंपणी विरोधात नागरीकांमधे रोष

महावितरण कंपनीचा अजब गजब कारभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नव्या विद्युत मिटरसाठी मागितल्या जाते पैसे : नागरिकांचा आरोप

     भद्रावती विज वितरण कंपणीच्या विरोधात शहरातील नागरीकांमधे रोष व्यक्त केल्या जात आहे. प्राप्त माहितीनुसार नव्या विद्युत मिटरसाठी पैसे मागण्यात येत असल्याचा आरोप नागरीकांकडून केल्या जात आहे. शहरातील अनेक ग्राहकांनी नव्या मिटरसाठी अर्ज सादर केलेले आहे व डिमांडसुध्दा भरले आहे.

       मात्र शहर विद्युत कार्यालयाकडून काही ना काही कारण दाखवून अर्ज रिजेक्ट करण्यात येत असल्याचा नागरीकांचा आरोप आहे. ज्यांनि अर्ज एकदा भरले आहे व ते रिजेक्त झाले आहे त्यांनी भरलेले डिमांड रुपया स्वरूपी वापस न देता नवीन अर्ज सादर करून नवीन डिमांड भरून त्याचे पैसे भरण्याकरिता सांगण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांना मनस्ताप तयार करावा लागत आहे. विद्युत मिटरसाठी अधिकाऱ्यांकडून पैसे मागल्या जात असल्याचा आरोप नागरीकांकडून होत आहे. अर्ज रिजेक्ट करण्याचे कारणही सांगीतल्या जात नसल्याचे नागरीकांचे म्हणने आहे. या कार्यालयात अलीकडे दलालांचा सुळसुळाट वाढल्याची चर्चाही नागरिकांमधे आहे. त्याचप्रमाणे नवीन मीटर च्या अर्जासाठी दलाला मार्फत गेलेल्या अर्जाची दखल घेऊन त्यांना नवीन मीटर लागू करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे.

    याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाकडून नुकतेच आंदोलनही करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून याबाबतची सविस्तर माहिती आपणास दोन दिवसात देण्यात येईल असे सांगण्यात आले असून दहा दिवस लोटून सुद्धा आम्हाला या प्रकारची कुठलीही माहिती देण्यात आली नाही नसल्याचे भाजप युवक मोर्चाचे इम्रान खान यांनी बोलताना सांगितले. सदर प्रकाराची चौकशी वरीष्ठांनी करुन नागरीकांना न्याय देण्याची मागणी येथील ग्राहकांतर्फे तसेच भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये