समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अंधश्रद्धा निर्मुलन आणि वैज्ञानिक द्रुष्टिकोन रुजविणे आवश्यक : मा. धनजय तावाडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
श्री. शिवाजी महाविद्यालय, राजुरा, समाजशास्त्र विभागाच्या वतीने जीवती तालुक्यातील आदिवासी ‘टिटवी’ या दुर्गम गावात “वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणाविरोधी कायदा” या विषयावर आयोजित कार्यशाळेत धनंजय तावाडे आणि अनिल दहागावकर यांनी चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह अंधश्रद्धांशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दानू उईके होते. प्रा.विश्वास शंभरकर, प्रा. डॉ. विठ्ठल आत्राम, प्रा. डॉ. प्रमोद वसाके, प्रा. सागर ओडलेवार, पोलीस पाटील अरुण उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाला टिटवी गावातील विद्यार्थी युवक आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. टिटवी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अशोक उईके व राजेंद्र कुळमेथे सरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार मोठी मदत केली.