घरात घुसून चोरी करणारे पुलगाव पोलीसाच्या जाळ्यात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर याप्रमाणे की, नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील फिर्यादी हे दिनांक 29/04/2024 चे सायकांळी 05/00 वा. शारदा माता म्हैयर मध्यप्रदेश येथे सहपरिवार दर्शनाकरीता गेले असता दिनांक 02/05/2024 रोजी सकाळी 08/30 वा. दरम्यान घरी परत आले असता त्याच्या घरातील मेन दरवाजा कुलुप तुटलेला दिसता आतमधिल दरवाजा सुध्दा तुटलेला दिसला तेव्हा फिर्यादी ने घरात जावुन पाहीले असता घरातील आलमारीतील कपडे तसेच घरातील टि.व्ही खाली पडलेली दिसले व इतर घरगुती वस्तु फेकफाक करुन जमीनीवर अस्थाव्यस्त पडलेले दिसले त्यावेळी फिर्यादी ने घरातील आलमारीची पाहनी केली असता आलमारीचे लाँकर खुले दिसुन आले लॉकर मध्ये ठेवुन असलेले 1) दोन चांदीच्या तोरड्या वजन अंदाजे 20 ग्रम वजनाची किमंत अंदाजे 8000/-रु. 2) एक चांदीचा कडा 05 ग्रम किमंत 2000/-रु. 3) दोन भरुन असलेले इंन्डेन कंपनीचे सिलंडर अंदाजे किमंत 2000/-रु. 4) दोन लहान मुलांचे गुलक्क त्यामध्ये अंदाजे किमंत 4000/-रु. 5) बि.पी.आणि शुगर ची मशिन अंदाजे किमंत 4000/-रु. 6) नगदी 64000/-रु. असा एकुण जुमला किमंत 84000/-रु. चा माल कोणीतरी अज्ञात इसमाने दिनांक 29/04/2024 चे सायंकाळी 05/00 वा. ते दिनांक 02/05/2024 चे सकाळी 08/30 वा. दरम्यान घराचे गेटचे मेन दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन वर नमुद केलेल्या चिजवस्तु व नगदी रुपये चोरुन नेले अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन पुलगाव येथे अपराध क्रमाक 0401/2024 कलम 380,454,457 भा.द.वी.चा गुन्हा नोद करुन तपासात घेतला.
सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री. राहुल सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अमंलदार स.फौ.सुधिर लडके ब.क्र.1036 पोलीस स्टेशन पुलगाव हे तपास करीत असताना यातील आरोपी क्र.1) यश उर्फ शेशकुमार इंगळे वय 21 वर्ष 2) सुरेंद्र उर्फ मोंटु प्रमोदराव ढेंगे वय 24 वर्ष दोघेही रा.गांधी नगर पुलगाव ता.देवळी जि.वर्धा गांधी नगर पुलगाव येथुन ताब्यात घेवुन आरोपी क्र. 1 यांनी कबुली निवेदन केल्याने मेमोरंडम पंचनामा कारवाई प्रमाणे 1) दोन चांदीच्या तोरड्या अंदाजे वजन 20 ग्रँम वजनाची अंदाजे किमंत 8000/- रु. 2) एक चांदीचा कडा अंदाजे वजन 05 ग्रॅम किमंत 2000/- रु. 3) एक भरुन असलेले सिलेंडर अंदाजे किमंत 10000/- रु. 4) बि.पी.व शुगर मोजण्याचे मशिन अंदाजे किमंत 4000/- रु. असा एकुण जुमला किमंत 15000/-रु. तसेच आरोपी क्र. 2 यांचे ताब्यातुन एक इणडेंन कंपनीचे सिलेंडर अंदाजे किमंत 1000/-रु. व चोरी करते वेळी कुलुप तोडण्यासाठी वारलेली लोखंडी सळाख अंदाजे किमंत 100/- रु. तसेच आरोपी क्र. 1 व 2 यांनी पो.स्टे.ला दाखल अपराध क्रमाक 241/2024 कलम 380,457 भा.द.वी.चे गुन्ह्यातील चोरीस केलेला मुद्देमाल त्यांचे ताब्यातुन दोन मोबाईल फोन तसेच एक पिवळ्या धातुचे गळ्यातील पोत व दोन पिवळ्या धातुच्या कानातील बिऱ्या जप्त करण्यात आले.
सदरची कार्यवाही मा.नरुल हसन पोलीस अधिक्षक सा.जिल्हा वर्धा, मा.डॉ.सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक, मा.सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगाव श्री.राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात श्री.राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणाचे अंमलदार सुधिर लडके ,रितेश गुजर, ओमप्रकाश तल्लारी,विश्वजीत वानखेडे यांनी केली आहे.