Sudarshan Nimkar
महाराष्ट्र

चांदा ब्लास्ट :मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- आज २८ आक्टोंबर ला बल्हारपुर शहरातील जंगल ला लागून असलेल्या पंडीत दिनदयाल वार्ड येथे शेरा सुर्यवंशी यांच्या घरी १३ फूट लांब अजगर साप आढळून आला.
त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना देण्यात आली. माहिती प्राप्त होताच बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कर्मचारी हे मौका स्थळी तात्काळ हजर झाले व सर्पमित्र ओम प्रकाश चव्हाण व सुनील जयस्वाल यांचे मदतीने अजगर या प्रजातीचे सापाला पकडुन बल्हारशाह नियतक्षेत्रातील वनखंड क्रमांक ४९३ मध्ये निसर्ग मुक्त करण्यात आले.
रेस्क्यु करण्यात आलेला अजगर हा १३ फुट लांबीचा होता. रेस्क्यु मध्ये के. एन. घुगलोत, क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह, एस. एम. बोकडे, नियवनरक्षक बल्हारशाह, नितेश बावणे, सर्पमित्र ओम प्रकाश चव्हाण व सुनील जयस्वाल यांनी परिश्रम घेतले. त्यामुळे अजगर या सापाला नविन जिवनदान मिळाले व त्याला वनात निसर्ग मुक्त करण्यात आले.

तसेच २७ आक्टोंबर रोजी मौजा केम तुकुम गावा लगतील विठ्ठल बाबुराव कुळमेथे यांचे शेतात अजगर साप दिसुन आला. त्याला सर्पमित्र अखिल लभाने याचा मदतिने पकडुन वनखंड क्रमांक ४९६ देव बोडी परीसरात निसर्ग मुक्त करण्यात आले. रेस्क्यु करण्यात आलेला अजगर हा ६ फुट लांबीचा होता. याकामी सपमित्र अखिल लभाने, कु. उपा ए. घोडवे, नियतवनरक्षक केम, कु.बी.पि. तिवाडे, नियतवनरक्षक लावारी २ व पीआरटी टिम, केम तुकुम यांनी परिश्रम घेतले त्यामुळे अजगर या सापाला नविन जिवनदान मिळाले व त्याला वनात निसर्ग मुक्त करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये