Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नववर्षानिमित्त अंध विद्यालयात भोजनदान

वरदविनायक स्पोर्टिंग क्लब गवराळाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            येणारे नवीन वर्ष अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुखाचे व समृद्धीचे जावो ही मनोकामना करीत गवराळा येथील वरदविनायक स्पोर्टिंग क्लब तर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून नवीन वर्षाचे औचित्य साधत तालुक्यातील निंबाळा येथील प्रेरणा अंध विद्यालयात भोजनदान देण्यात आले.सदर स्पोर्टिंग क्लब हा नेहमी सामाजिक व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहे.

नव्या वर्षात कोणतिही मौज मजा न करता वंचित असलेल्या घटकांसोबत साजरा करण्याची संकल्पना सदर स्पोर्टिंग क्लब तर्फे मांडण्यात आली, त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम निरंतर सुरू आहे. त्यानुसार हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

सकाळी क्लबचे सर्व सदस्य प्रेरणा अंध विद्यालयात गोळा झाले, प्रारंभी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर सर्वांना भोजनदान देण्यात आले. यावेळी सर्व वरद विनायक स्पोर्टिंग क्लबचे सदस्य,सदर विद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये