ताज्या घडामोडी

अन् ते बाळ आले मातेच्या कुशीत – चंद्रपूर पोलिसांनी 3 तासात लावला चोरीला गेलेल्या बाळाचा छडा

हिंगणघाट येथुन अपहृत बाळ आणले परत - आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयातुन चार दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची घटना उघडकीस येताच सर्वत्र खळबळ उडाली होती. चंद्रपूर शहर पोलिसांनी 3 तासांच्या आत सदर बाळाचा शोध घेऊन हिंगणघाट येथुन त्या बाळाला परत आणले असुन बाळ आता मातेच्या कुशीत स्थिरावले आहे.

सकाळी आठ वाजताच सुमारास हे बाळ रुग्णालयातून चोरी झाल्याचे लक्षात येताच सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. शहर पोलिसांना बाळाच्या चोरीची वर्दी मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सपोनी मंगेश भोंगळे ह्यांनी रुग्णालयात धाव घेऊन सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली असता त्या फुटेजमधे एक संशयास्पद महिला आढळून आली. त्या महिलेने मागील चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल मातेशी जवळीक साधली. आणि संधी मिळताच त्या बाळाला घेऊन पसार झाली. पोलिसांच्या चमूने सीसीटीव्ही फुटेजचे सखोल निरीक्षण केले असता त्या महिलेनेच बाळाचे अपहरण केले असल्याचे निष्पन्न होताच त्यांच्या चमुने महिलेचा शोध घेणे सुरू केले असता ती महिला हिंगणघाट येथिल असल्याचे कळताच त्यांनी अवघ्या 3 तासात त्या महिलेला थेट हिंगणघाट येथुन ताब्यात घेतले असता तिने बाळ चोरल्याचे मान्य करून बाळाला पोलिसांच्या स्वाधीन केले. बाळ मिळाल्याचे कळताच त्या महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाझरू लागले. शहर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असुन त्या बाळाच्या कुटुंबीयांनी शहर पोलिसांचे आभार मानले आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये