ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचे नेते किशोर खेरकार याचे आजपासून नगरपरिषद वर्धा सोमोर आमरण उपोषण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा नगरपरिषद अंतर्गत लोकशाहीत अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत 12,15 व 19 असे 33 विविध कामाची जाहिरात जा क्रमांक 1262/ बांधकाम ई-निविदा दिनांक 31/10/2023 नुसार दिनांक 2/06/2023 ते 12/07/ 2023 रोजी काढलेल्या निविदा ह्या मुख्याधिकारी व ठेकेदार यांच्या मिलीभगात व सगमताने काढण्यात आल्या होत्या या निविदेत मोठा घोळ झालाचा आमचा स्पष्ट आरोप आहे मुख्याधिकारी यांनी G. O. TAG निविदा काढलेल्या या मध्ये सहज दिसून येते की आपल्या मर्जीतील ठेकेदारांना हेतू पुरस्कर काम देण्याचे ठरवले आहे त्यामध्ये जवळ ठेकेदांना सहज काम देण्यासाठी नियमबाह्य अटी व शर्ती शुद्धिपत्रकाच्या माध्यमातून निविदेत टाकण्यात आल्या त्या निविदा त्वरित रद्द करून वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात पुन्हा प्रक्रिया करण्यात याव्या, मुख्यअधिकारी हे निविदा पुन्हा करण्यास का तयार नाही ?यामध्ये त्याची टक्केवारी तर ठरली नाही ? हा पण आमचा आरोप आहे , त्याचबरोबर माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती हे इतर ठेकेदारांना माझ्या वार्डात काम टाकल्यास तक्रार करेल बिल,निघू देणार नाही अशा धमक्या देताना दिसून येत आहे , माजी नगरसेवक यांनी नगरपरिषद विकत घेतली का याचा आमचा स्पष्ट आरोप आहे, मुख्याधिकारी यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये घोळणा नझाल्यास ह सांगत असेल तर काही वॉर्ड मध्ये तीन निविदा कशा काय आल्या मंग भ्रष्टाचार नाही तर काय ? निविदा रद्द न झाल्यामुळें नगरपरिषद समोर वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वय विदर्भ चे नेते किशोर खेरकार यांनी आज पासून आमरण उपोषण ला सुरुवात केली असून त्याच्या सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर, भीम आर्मी संविधान रक्षक दल विदर्भ अध्यक्ष अशीष सोनटक्के, बहुजन युथ पँथर विदर्भ अध्यक्ष बबलू राऊत, बंटी रंगारी,धीरज गुजर,सतीश इंगळे,दिपणकर लोणारे ,नितीन इंदुरकर ,अक्षय हुमने, मनोज कांबळे, आयुष्य म्हेसकर, आशिष चौधरी, कमलेश उमरे, सुरज कांबळे, सचिन माटे, अनुराग डोगरे, भीमा शंभरकर, सोलहल कांबळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये