Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

“त्या” अस्वलाला अखेर आयुध निर्माणी परिसरात पिटाळण्यात वनविभागाला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         दिनांक 26 ला रात्रोच्या वेळेला एक अस्वल हायवे ओलांडून शहरातील तहसील कार्यालया जवळील झुडपी मैदानात शिरल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या अस्वलाला परत आयुध निर्माणी परिसरात पिटाळण्यात अखेर वनविभागाला यश प्राप्त झाले.

लगतच्या आयुध निर्माणी परिसरातून सदर अस्वल हे हायवे ओलांडून तहसील कार्यालया जवळील झुडपी मैदानात शिरले होते. घाबरलेल्या या अस्वलाने मैदानातील झुडपात दिवसभर आश्रय घेतला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळपासूनच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या संपूर्ण परिसराला सील करण्यात आले. मात्र दिवसभर बघ्यांची गर्दी आणि आजूबाजूला असलेली वर्दळ यामुळे या अस्वलाचा रेस्क्यू करणे कठीण आणि धोकादायक झाले होते. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने रात्रोला सर्वत्र शांतता पसरल्यानंतर या अस्वलाला बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न केला.

प्रारंभी हे अस्वल या परिसरातच इकडे तिकडे पळाले. मात्र शेवटी रात्रो एक च्या दरम्यान या अस्वलाला आयुध निर्माणी च्या परिसरात परत पीटाळण्यात वन विभागाला यश प्राप्त झाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये