ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर मुहूर्त सापडला – खासदार अमर काळे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज अखेर झाले थाटामाटात उद्घाटन

मोहन नगर नागपुर रोड वर्धा येथे थाटले संपर्क कार्यालय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज घट स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे यांच्या संपर्क कार्यालयाचे बऱ्याच प्रतिक्षेनंतर कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडी चे नेते तसेच वर्धा सोशल फोरम चे अध्यक्ष डॉ.अभ्युदय मेघे, अविनाश काकडे, शैला दिक्षित, महेंद्र मुनेश्वर, सलिम शेख,तुषार उमाळे,इमरान राही,शेखर शेंडे, नितेश कराळे, मनोज चांदुरकर, तुषार देवढे,यांच्या सह बरेच दिग्गज नेते तसेच असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रितसर उद्घाटन पार पडले.

आपण खासदार होऊन बरेच दिवस झालेत आजचाच दिवस का म्हणुन निवडण्यात आला असे विचारता यापुर्वीच संपर्क कार्यालय थाटले असते परंतु विशेष दिवसाला अधिक महत्त्व असते म्हणुन आज घट स्थापने चार पहिला दिवस आहे त्यामुळे आज संपर्क कार्यालयाचे रितसर उद्घाटन करण्यात आले असल्याचे याप्रसंगी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे यांनी आपल्या प्रतिक्रियेतुन कळविले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये