ताज्या घडामोडी

शासकीय रुग्णालयातुन नवजात बाळ चोरी – प्रशासनाचा गलथानपणा पुन्हा उघडकीस

4 दिवसाच्या बाळाच्या चोरीने खळबळ - पोलीस तक्रार दाखल

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयामधुन चार दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असुन ह्यामुळे रुग्णालय प्रशासनावर तसेच सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार चार दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात एका महिलेची प्रसुत झाली. मात्र आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्या महिलेच्या शेजारी असलेले बाळ दिसेनासे झाले. सुरुवातीला नातेवाईकांनी बाळाला कोवळे उन्ह दाखवायला बाहेर नेले असेल असा मातेचा समज झाला मात्र नातेवाईकांनी बाळाला बाहेर नेले नसल्याचे स्पष्ट होताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.

रुग्णालयात सर्वत्र शोधाशोध करूनही बाळ आढळुन न आल्याने पोलीस तक्रार देण्यात आली असुन ह्या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासन तसेच रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयात सुरक्षेसाठी खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले असुन त्यांचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे मात्र बरेचदा हे सुरक्षा रक्षकांना रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खाजगी कामासाठी सुद्धा तैनात व्हावे लागते त्यामुळे अर्थातच सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडल्या जाते. पोलिसांना तक्रार प्राप्त होताच रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासणे सुरू केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये