ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भीवापुर वार्डात होत आहे नवीन श्रीराम मंदिराची स्थापना

दिंडी यात्रा, भजन कीर्तन, रामकथा एवं भव्य महाप्रसादाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

दिनांक २० आणि २१ जून, २०२३ ला बंगाली प्रांतीय कॉलनी, भिवापुर वार्ड, चंद्रपुर येथे श्री राम मंदिराची स्थापना होत आहे. दिनांक २० जून ला सकाळी भजन, सायंकाळी श्री महाकाली मंदिरापासून ते नवीन मंदिरापर्यंत दिंडी यात्रा काढण्यात येईल. रात्री ०९ वाजता श्री मुरलीजी व्यास हे आपल्या मधुर वाणी मधे रामकथा संबोधित करतील. दिनांक २१ जूनला सकाळी श्री राम मंदिरात श्री राम दरबारची नवीन मूर्तींची प्राणपतिष्ठा करून स्थापना करण्यात येईल व सायंकाळी मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन केले आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध भजन मंडळ व ईतर हिंदू संगठन मंदिराच्या या दोन दिवसीय कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या नवीन मंदिराच्या ठिकाणी पहिले श्री मारुतीचे मंदिर होते. या मंदिराची प्रथम स्थापना वर्ष २०१० मधे भिवापूर वॉर्डातील नागरिकांतर्फे करण्यात आली. पण काळानुसार हे मंदिर जीर्ण होत गेले आणि भिवापूर वार्डातील युवा नागरिकांनी या मंदिराची परिस्थिती बघून संकट मोचन हनुमान मंदिर सेवा समिती या नावाने संस्थेची नोंदणी करून नवीन मंदिराची स्थापना करण्याची जबाबदारी उचलली. आता मंदिराचे नवीन बांधकाम करून मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. चंद्रपूरचे विविध गणमान्य नागरिक व हिंदू भक्तगण या दोन दिवसीय मंदिर स्थापनेच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे.या दोन दिवसीय मंदिर स्थापनेच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येत चंद्रपूर येथील हिंदू भक्तांनी सहभागी व्हावे अशे आव्हान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.विक्की निखारे,सनी धकाते,मनोज मतकुलवार,प्रवीण गड्डमवार,जयंत सरकार,प्रमिल कांबळे,नितीन पाठे,संजय पॉल,हरिष धकाते,रवि कोहाड,राज अटकापुरवार,यश निनावे,विशाल धकाते,महेश मतकुलवार,आशुतोष आस्वले,शुभम निषाद,राजू कुंभारे,घनश्याम भोगेकर,अमोल भिसे व चंद्रपूरचे ईतर मंदिराच्या स्थापने संबंधित विविध कार्यक्रमात सहकार्य करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये