Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

२५ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांना साजरा केला आठवणींचा अमृतमहोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना -वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोरपना येथे १९९८-९९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात पार पडला. २५ वर्षांनंतर जुन्या मित्रांच्या भेटीने शालेय जीवनाच्या गोड आठवणींना पुन्हा ताज्या झाल्या. पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या तरुणपणाच्या आठवणींना उजाळा देत वातावरण आनंदमय केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी बी बोंडे, संस्थेचे संचालक गणेश गोडे,सेवानिवृत्त माजी प्राचार्य संजय ठावरी , माजी प्राचार्य दिगांबर खडसे, सेवानिवृत्त प्राध्यापक अरुण कुकडे, सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक नारायण हजारे, टेंभूर्डे,उरकुडे, उइके, पाचभाई आदी उपस्थित होते.यावेळी दिवंगत शिक्षक आणि वर्ग मित्रांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमात उपस्थितांनी २५ वर्षांत आपल्या आयुष्यातील यशस्वी वाटचालीची माहिती उपस्थिताना दिली. शिक्षण, सामाजिक कार्य, कुटुंब, व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्याच्या अनेक पैलूंवर गप्पांची देवाणघेवाण झाली. याप्रसंगी शिक्षकांचा ही सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात भाग्यश्री रणदिवे, जयश्री खामनकर, किरण गुर्जर,लांडे, परचाके , सुनीता डाहुले,सरला महले, हाफिज शेख, प्रवीण कारेकर, महेश हजारे, राजेश ठाकरे, विनोद गिरडकर, पंडित मालेकर , सतीश झाडे , सतीश मिटकर, किशोर बोरडे, ईश्वर मालेकर,विनय मेश्राम, विनायक ठाकरे, दीपक माहुरे, दिनेश मालेकर, जितेंद्र निरंजने , दिनेश लांडगे, विनोद वैरागडे, रिजवान शेख, संभाशिव गावंडे, संतोष बोरडे, जितेंद्र पिंपळकर, संजय आमने, शकील शेख आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये