गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा (विशेष पथक) वर्धा यांची आष्टी येथील जुगार अड्यावर छापा

एकूण ६ लाख २७ हजार ८९५ रू चा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १७.०.२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा (विशेष पथक), वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय सुत्राकडून पोलीस स्टेशन आष्टी हद्दीत मौजा आष्टी येथील होलीपुरा येथे इसम नामे मोहन रामसिंग चव्हान हा भाडे तत्वार जागा घेवून सट्टापट्टीचा जुगार चालवित आहे, अशा माहितीवरून मा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा श्री. नूरुल हसन यांचे आदेशान्वये रवाना होवून महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये छापा कारवाई केली असता यातील आरोपी १) मोहन रामसिंग चव्हान, वय ५० वर्ष, रा. होलीपुरा, आष्टी ता. आष्टी जि. वर्धा हा त्याचे साथीदार नामे २) हर्षल दिलीपराव सुरजुसे, वय २८ वर्ष, रा. माळीपुरा, आष्टी ता. आष्टी जि. वर्धा ३) मंगेश भिमराव सरपाल ४) प्रमोद मारोतराव पाटील दोन्ही रा. माळीपुरा, आष्टी ता. आष्टी जि. वर्धा हे लोकांकडून नगदी पैसे घेवून सट्टापट्टी घेत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच आरोपीतांचे ताब्यातून एक लोखंडी तलवार, एक चाकू व देशी विदेशी दारू मिळून आल्याने आरोपीतांविरूध्द भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

आरोपीतांचे ताब्यातून १) सट्टापट्टीचे नगदी ४,०७,२५५/- रूपये २) सॅमसंग मोबाईल किंमत ८,०००/-

रू ३) मोटर सायकल रॉयल इनफिल्ड बुलेट किंमत २,००,०००/- रू ४) विवो कंपनीचा मोबाईल किंमत १०,०००/- रू ५) कॅलक्युलेटर व इतर साहित्य किंमत ३०० /- रू ६) सट्टापट्टीचे साहित्य किंमत २४० /- रू ७) एक लोखंडी तलवार किंमत १,५००/- रू ८) लोखंडी चाकू किंमत १००/- रू ९) देशी विदेशी दारू किंमत ३००/- रू असा एकूण जुमला किंमत ६,२७,६९५ /- रू चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे (विशेष पथक), वर्धा पथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक संदिप ति. कापडे, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, यांचे प्रत्यक्ष हजेरीत पोलीस अंमलदार रोशन निंबाळकर, सागर भोसले, अभिजीत गावंडे, अरविंद इंगोले, हर्षल सोनटक्के, अभिशेख नाईक, प्रशांत आमनेरकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा (विशेष पथक) वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये