Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर, तथा प्राचार्य राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर,स्मिता चिताडे, माजी प्राचार्य, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर, विठ्ठलराव थिपे, उपाध्यक्ष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर, .धनंजय गोरे सचिव, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर , रामचंद्र सोनपितरे, संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर ,श्रीमती सुनीता लोढिया अध्यक्षा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था, नांदा फाटा उपस्थित होत्या.

या प्रसंगी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. आजच्याच दिवशी डॉ. अनिल चिताडे यांचा वाढदिवस असल्याने महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मनोहर बांद्रे ग्रंथपाल यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये