ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. बाळूभाऊ मित्र परिवार बल्लारपूर यांच्या वतीने सर्वधर्मीय व सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

चांदा ब्लास्ट

आव्हानांशी संघर्ष करून बाळू धानोरकर यांचे नेतृत्व तयार झाले. शून्यातून विश्व निर्माण केले. मात्र, पटकृत अर्ध्यावर सोन गेला. देव एच्छा निर होईल, याचा विचार आयुष्यात केला नाही, या शब्दांत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भावना व्यक्त केल्या.

स्थानिक गाँधी पूतल्या जवड शनिवारी 17 जून रोजी मंगळवारी दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांना सर्व धर्मीय व सर्व दलीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सर्वपक्षीय व सर्वधर्मीय श्रद्धांजली सभेला विविध धर्मगुरूंच्या शांतीपाठाने सुरुवात झाली.

या मध्ये शीख धर्माचे ग्यानी मिलोकसिंग, सनातन धर्माचे रामजी महाराज, मुस्लिम धर्माचे मौलाना हाफिज, ख्रिश्चन धर्माचे पाद्री श्याम मतगी,बौद्ध धर्मातून
श्रीमती आशा आणि रेखा मेश्राम यांनी शांती संदेशाचे वाचन केले. यानंतर विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी, राजकीय, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी शोक व्यक्त केला.

सर्वप्रथम भाजपाचे जेष्ठ नेता निलेश खरबडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू काबरा, शिवसेना शिंदे गटचे कमलेश शुक्ला, शिवसेना ठाकरे गटचे प्रणय काकडे, आम आदमी पार्टीचे रवी पुप्पलवार, व्हीआरएस सुरेश बटलेवार, निरज वाळके, एमवायएम शहीद शेख, बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा- वसंत मांद्रें, उलगुलान संघटना, राजू झोडे श्रीराम बालक आखाडा व व्यापारी मंडळचे रामधन सोमाणी, बल्लारपूर व्यापारी असोसिएशनचे रवींद्र फुलझेले, मराठा देवाडेघ, संभाजी ब्रिगेड व केन तुकाराम सेवा मंडळचे मनोहर मानकर, जेबीएसचे संतोष बेताल, पत्रकार संघचे वसंत खेडेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.रजनीलाई हजारे, जामा माजीद कमिटीचे शेख उस्मान या सर्वांनी माजी खासदार स्व. बाळूभाऊं प्रती शोक व्यक्त करून आदरांजली वाहिली.

शेवटी श्रद्धांजली सभेला उपस्थित शेकडो नागरिकांनी बाळूभाऊंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळले व श्रद्धांजली वाहिली

घनश्याम मूलचंदानी यांनी या सर्वधर्मीय व सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचा प्रस्तावना केली आणि संचालन अब्दुल करीम यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये