गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीसांतर्फे नागरिकांना आवाहन

एकूण ४६२ वाहन धारकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यात होणारे अपघत कमी करण्याकरीता तसेच वाहतूक नियमांचे नागरिकांनी पालन करावे याकरीता वर्धा जिल्हा वाहतूक पोलीस विभागातर्फे संपुर्ण वर्धा जिल्ह्यात दिनांक १३.०६.२०२३ रोजी पासुन विशेष मोहिम राबविली जात आहे.

त्याअनुषंगाने दिनांक १६.०६.२०२३ रोजी विशेष मोहिम दरम्यान संपुर्ण जिल्ह्यात ३२२ विना हेल्मेट धारकांवर, १३७ विना सिटबेल्ट धारकांवर, ०३ दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर व इतर मोटर वाहन कायद्यानुसार एकूण ४६२ वाहन धारकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली असुन त्याममध्ये २,९६,१०० /- रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.

तसेच सदर विशेष मोहिम दररोज संपुर्ण वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येणार असुन वर्धा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांची विना हेल्मेट मोटर सायकल, विना सिटबेल्ट चारचाकी वाहन, दारु पिऊन वाहन चालवू नये. तसेच वर्धा जिल्ह्यात टोईंग वाहन सुरू करण्यात आलेली असुन नागरिकांनी नो पार्किंगमध्ये आपली वाहने ठेवल्यास टोईंग वाहनाद्वारे उचलून त्यावर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. वाहतूकींचे नियमांचे पालन करण्यात यावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये