Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सप्तखजरी वादक उद्यपाल महाराज यांनी पिंपरी येथे वासीयांना केले मंत्रमुग्ध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

जय अंबे दुर्गा मंडळाच्या वतीने सप्त खंजिरी जनक सत्यपाल महाराज यांचे परम शिष्य इंजि. उदयपाल महाराज वणीकर यांचे प्रबोधनात्मक किर्तन व सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण करण्यात आले.व्यसनमुक्ति, मोबाइलचा योग्य वापर,संस्कार, यावर कीर्तनातून प्रहार केला.

यात प्रथम क्रमांक कु.श्वेता संजय देवतळे (पिंपरी),द्वितीय क्रमांक निधी दिवाकर भसारकर (मांडवा), तृतीय क्रमांक हेमंत प्रदिप ठेंगणे( मांडवा) व चतुर्थ क्रमांक समिक्षा श्रीकांत थेरे (कुसळ)यांना वणी येथील परीविक्षाधिन नायब तहसीलदार प्रतिक गजाननराव बोरडे व श्री. अमोल विनायक लोडे (संचालक EIS,कोरपना) यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

सदर कार्यक्रमास वृंदा विजय कुंभारे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य गण, विलास कोरांगे तंटामुक्ती अध्यक्ष, रेखा बंडू तिखट पोलीस पाटील, रमेश बोरडे अध्यक्ष से.स.सो.नारंडा विमलताई सुधाकर जेनेकर अंगणवाडी सेविका हरीश गजानन खिरटकर जय अंबे दुर्गा मंडळाचे अध्यक्ष पंकज आंबेकर, मन्सूर शेख, शुभम जेनेकर व समस्त मंडळाचे सदस्य आणि पिंपरी ग्रामवासी यांनी उपस्थित दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये