Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेतर्फे विविध मागण्या घेऊन तहसीलदारा मार्फत वरिष्ठांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद चंद्रपूर जिल्हाच्या वतीने आदिवासी समाजातील विविध मागण्या घेऊन माननीय तहसीलदार सावली यांच्यामार्फत माननीय सचिव आदिवासी विभाग मंत्रालय,माननीय सचिव आदिवासी विभाग मंत्रालय मुंबई,माननीय आयुक्त आदिवासी विभाग नाशिक, माननीय अपरायुक्त आदिवासी विभाग नागपूर, एकात्मिक विकास आदिवासी विभाग प्रकल्प चंद्रपूर, यांना देण्यात आले.

यातील मुख्य मागण्या सावली तालुक्यातील आदिवासी मुलांच्या वस्तीगृहा करिता स्वतंत्र इमारत व्हावी करिता सावली येथील 797 ,98 सर्वे नंबर असलेल्या शासकीय जागेवर आदिवासी मुलांचे वस्तीगृह बांधकाम करण्यात यावे, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सुरू असलेल्या कंपन्यांमध्ये आदिवासींच्या युवकांना युवतींना भरती करण्यात यावे, 2005 च्या आत मधील आदिवासीचे अतिक्रमण आहे त्यांना पट्टे देण्यात यावे, आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्याकरिता काटेरी तार, मोटर पंप,विहीर,लाईट, पंपाची व्यवस्था करून देण्यात यावी, जिल्ह्यातील आदिवासी अपंग विधवा परितक्यांना उद्योगासाठी दोन लाख रुपये वार्षिक निधी देण्यात यावे.

जिल्ह्यातील आदिवासी युवक युती यांना बेरोजगारीतून मुक्त करण्याकरिता दहा ते पंधरा लाख व्यक्तिगत व्यवसायाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावे, जिल्ह्यातील आदिवासींचे बचत गट व संस्थांना दहा लाख ते एक कोटी पर्यंतच्या निधी उद्योगाकरिता उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून बचत गटाच्या माध्यमातून गटातील समूह सक्षम होईल याकरिता शासनाने मदत द्यावी.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी मुलामुलींकरिता कॅम्पुटर, टायपिंग प्रशिक्षण सुरू करण्यात यावे, चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना एमपीएससी, यूपीएससीचे क्लासेस जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात यावे, जिल्ह्यातील आदिवासी युवक युवतींना दुचाकी, चार चाकी , जड वाहनाचा परवाना निशुल्क देण्यात यावे इत्यादी मागण्या घेऊन अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेच्या माध्यमातून सावलीचे नायब तहसीलदार मडावी साहेब यांच्या मार्फतीने देण्यात आले

 निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास चंद्रपूर जिल्हा युवक अध्यक्ष अतुल कोडापे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ शाखा अध्यक्ष कृष्णा मसराम, टायगर सेना महासचिव जितेश कुळमेथे,अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषद सावली तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम, सचिव अशोक कन्नाके, उपाध्यक्ष लखन मेश्राम, उपाध्यक्ष उत्तम गेडाम,वासुदेव मडावी, युवराज ऊईके,विराज सुरपाम, इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये