ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मानाने सुरज दहागावकर सन्मानित…

चांदा ब्लास्ट

संविधान ओळख उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व संविधानाच्या जाणीव जागृतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने संविधान फाउंडेशन, नागपूर यांच्यातर्फे सुरज पी. दहागावकर यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मानाने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना सन्मानपत्र, इ. झेड. खोब्रागडे लिखित ‘आपले संविधान’, ‘संविधान ओळख’ व डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे ‘लॉकडाऊन’-कवितासंग्रह या पुस्तकांचा संच देऊन गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील (भापोसे) यांच्या हस्ते गौरवांकित करण्यात आले.

संविधान जागृतीसाठी सुरजने आतापर्यंत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन, विचारज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून संविधान दिनी संविधानाच्या आधारावर राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन, मित्रांच्या, नातेवाईकांच्या लग्नप्रसंगी नवदाम्पत्याला भारतीय संविधान ग्रंथ सस्नेह भेट, संविधानावर लेख आणि काव्यलेखन अशा विविध उल्लेखनीय कार्यासाठी माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात त्याला हा सन्मान देण्यात आला.

सुरज हा विचारज्योत फाऊंडेशनचा संस्थापक अध्यक्ष असून इंडिया दस्तक न्युज टीव्हीचा मुख्य संपादक आहे. सोबतच तो युवा कवी आणि लेखक असून त्याचे १०० हून अधिक विविध विषयावरील लेख आणि कविता प्रकाशित आहेत. सुरज हा मूळचा चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यातील चेकबापुर (सकमुर) गावाचा असून तो समाजकार्य शिक्षणात पदव्युत्तर आहे. ग्रामीण भागातून आलेला सुरज हा समाजकार्यासाठी नेहमी धडपड करत असतो. त्यामुळे त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याला डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान-२०२३ मिळाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सन्मान वितरण प्रसंगी आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचरचे अध्यक्ष दादाकांत धनविजय, संविधान फाऊंडेशनच्या रेखा खोब्रागडे, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, दीपक निरंजन, दिगंबर गोंडाणे, शिरीष कांबळे, नेहा खोब्रागडे, विजय बेले, अल्का निरंजन, कल्पना कांबळे, अतुलकुमार खोब्रागडे, विजय कांबळे, सुधामती अवथरे, विभा कांबळे, छाया मेश्राम आणि मोठ्या संख्येने सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये